मराठी: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे अभियान आहे.
🎯 मुख्य घटक :
ग्रामपंचायत स्तरावरील कार्यक्षम
योजनांचा प्रभावी वापर (ग्रामीण रोजगार, शाश्वत विकास, पायाभूत सुविधा)
निधीचे योग्य व्यवस्थापन
ग्रामपंचायत कार्यालयांचे सुसज्जीकरण
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण
🎯 उद्दिष्टे / Objectives
ग्रामपंचायतींचा शाश्वत विकास / Sustainable Gram Panchayat Development
🏡 या अभियानाचे उद्दिष्ट :
ग्रामपंचायती सक्षम करणे – प्रशासकीय, तांत्रिक आणि आर्थिक क्षमता वाढवणे.
ग्रामविकासात लोकसहभाग वाढवणे – ग्रामसभा आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे.
पारदर्शकता आणि जबाबदारी – ग्रामपंचायत स्तरावर योजना अंमलबजावणी पारदर्शक व जबाबदार पद्धतीने करणे.
आधुनिकीकरण – डिजिटल ग्रामपंचायत, ई-गव्हर्नन्स, ऑनलाईन सेवा उपलब्ध करणे.
समृद्ध ग्रामविकास – पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रस्ते, प्रकाश व्यवस्था, पर्यावरण संरक्षण यामध्ये सुधारणा करणे.